‘कमल हासन आणि काजल अग्रवाल क्रेन क्रॅश दुर्घटनेत थोडक्यात बचावले नाही तर…’, डिझायनरचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार कमल हासनच्या इंडियन 2 या सिनेमाच्या सेटवर बुधवारी एक दुर्घटना घडली. चेन्नईच्या ईव्हीपी स्टुडिओच्या सेटवर एक क्रेन क्रॅश झाली. या घटनेत सिनेमाच्या असिस्टंट डायरेक्टरसहित तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 लोक जखमी झाल्याचं समजत आहे. या घटनेच्या एका प्रत्यक्षिदर्शीनं याबाबत माहिती दिली आहे. सिनेमाची कॉस्ट्युम डिझायनर अमृता राम हिच्यानुसार, सिनेमाचे हिरो कमल हासन आणि अॅक्ट्रेस काजल अग्रावाल हेही या क्रेन पासून फार थोड्या अंतरावर होते. या घटनेतून ते थोडक्यात बाचावले आहेत.

अमृत रामनं याबाबत ट्विट केलं आहे. अमृता म्हणते, “या भयानक अपघातातून थोडक्यात बचावले. या क्रेन क्रॅशपासून फक्त 10 सेकंदाचं अंतर होतं. आम्ही खूप भाग्यवान आहोत. कमल हासन सर, काजल आणि मी थोडक्यात बचावलो आहोत. या दुर्घटनेत ज्यांचा जीव गेला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

या दर्घटनेत मधु (29, डायरेक्टर शंकर यांचा पर्सनल डायरेक्टर), कृष्णा (34, असिस्टंट डायरेक्टर) आणि एक स्टाफर चंद्रन (60) यांचा मृत्यू झाला आहे. एस शंकर या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यानंतर या सनेमाची भरपूर चर्चा होताना दिसली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशीरा कमल हासनही रुग्णालयात आले होते. त्यांनी जखमींची चौकशी केल्याचंही बोललं जात आहे.

इंडियन 2 सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात सिद्धार्थ, रकुल प्रीत, बॉबी सिन्हा आणि प्रिया भवानी शंकर हे कलाकार दिसणार आहेत. कमल हासन यांच्या 1996 साली आलेल्या इंडियन या सिनेमाचा हा सिक्वल आहे.

You might also like