Preity Zinta Net Worth : प्रीती झिंटा इतक्या कोटींची मालकीण, IPL टीमशिवाय जाणून घ्या कशात करते गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बॉलीवुड अभिनेत्री प्रीती झिंटा 22 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. बॉलीवुड कलाकार प्रीती झिंटाने आपल्या शानदार करियर दरम्यान अनेक यशस्वी चित्रपटात काम केले आहे. एका अभिनेत्रीसह ती व्यवसायिक, लेखक आणि मॉडेलसुद्धा आहे. प्रीती झिंटाची नेट वर्थ किंती आहे, याची माहिती आपण घेणार आहोत…

Celebritynetworth.com मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रीती झिंटाची एकुण संपत्ती सुमारे 10 मिलियन युएसडी आहे. रुपयात तिची एकुण संपत्ती 73,87,75,000 रुपये (73.87 कोटी रुपये) होते. प्रीती झिंटाची स्वताची प्रॉडक्शन कंपनी सुद्धा आहे, ज्यास पीझेडएनझेड म्हटले जाते, जी तिच्या नेट वर्थमध्ये आणखी वाढ करते.

प्रीती प्रत्येक फिल्मचे सुमारे 2-3 कोटी रुपये घेते. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, प्रीतीकडे दोन अलिशान अपार्टमेंट आहेत, ज्यापैकी एक मुंबईत आणि दुसरे एलए, कॅलिफोर्नियामध्ये आहे, जेथे ती आपल्या पतीसोबत राहाते. याशिवाय प्रीती एका आयपीएल टीमची मालकीणसुद्धा आहे. ती वर्साची आणि हाऊटे 24 सारख्या ब्रँडच्या जाहीरातीत सुद्धा काम करत आहे. प्रीतीचे सध्या इंस्टाग्रामवर सुमारे 7.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रीतीने शाहरुख खान आणि मनीषा कोइरालाची फिल्म ’दिल से’मधून बॉलीवुडमध्ये आपला प्रवास सुरू केला होता.

यानंतर तिने ’कल हो ना हो’, ’कोई मिल गया’ आणि ’कभी अलविदा ना कहना’ यासारख्या कमाई करणार्‍या चित्रपटांमध्ये काम केले, यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. प्रीती झिंटा सनी देओलसोबत भैयाजी सुपरहिट या चित्रपटा अखेरची दिसली होती.

’भैयाजी सुपरहिट’ चित्रपटात प्रीती झिंटा, सनी देओल, अरशद वारसी आणि अमीषा पटेलची महत्वाची भूमिका आहे. हा चित्रपट एका गुंडाची कथा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like