श्रद्धा कपूर करणार फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ सोबत लग्न ? वरुण धवननं दिले ‘हे’ संकेत

बॉलिवूडमध्ये वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नानंतर लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. वरुणनं आता श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) च्या लग्नाचे संकेत दिले आहेत. वरुण-नताशाच्या लग्नानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अशात सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ (Rohan Shrestha) यानंही वरुणला शुभेच्छा दिल्या. वरुणनं रिप्लाय करत म्हटलं की, आशा आहे की, पुढचा नंबर तुमचा असेल. रिपोर्टनुसार, रोहन आणि श्रद्धा एकमेकांना डेट करत आहेत.

वरुणच्या या गोष्टीनंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की, पुढचा नंबर हा रोहन आणि श्रद्धा यांच्या लग्नाचा असू शकतो. रोहननं इंस्टा स्टोरीला वरुण आणि नताशाचा फोटो पोस्ट करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. वीडी तू खूप नशीबवान मुलगा आहेस असं तो म्हणाला आहे. याला रिप्लाय करताना वरुणनं रोहनला विचारलं की, काय आता तूही तयार आहेस का.

अनेक मीडिया रिपोर्ट्सने खूपदा असा दावा केला होता की, शक्ती कhttps://twitter.com/TimePassTalks/status/1353940949509021696?s=20पूरची लाडकी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न करणार आहे. एवढेच काय तर तिच्या लग्नाचा टाईमदेखील सांगितला जात होता. या रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात होतं की, श्रद्धा आपल्या लाँग टाईम बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा सोबत लग्न करणार आहे. श्रद्धानं कधीच यावर काही भाष्य केलं नाही.

रोहनबद्दल बोलायचं झालं तर तो एक सेलेब्रिटी फोटोग्राफर आहे. टिन्सेल शहरातील प्रसिद्ध फोटोग्राफर्सपैकी रोहन एक आहे.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती इच्छाधारी नागिण साकारताना दिसणार आहे. ती काही दिवसांपूर्वीच स्त्री, स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमात वरुण धवनसोबत आणि बागी 3 सिनेमात टायगर श्रॉफसोबत काम करताना दिसली आहे.