जान्हवी कपूर, ईशान खट्टरची  खरी प्रियसी नाही…  

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  आत्ताच झालेला हिंदी चित्रपट धडक मधील ईशान खट्टर आणि जान्हवी कपुर यांची जोडी चित्रपटानंतर प्रेक्षकांचा नजरेत आली आहे.  ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची जोडी मराठी चित्रपट सैराटचा  हिंदी रीमेक धडक या चित्रपटात नजरेस आली होती. धडक चित्रपटानंतर ही जोडी सगळ्यांनाच खूप आवडली होती. श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने धडक चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या दोन्ही कलाकारांची  केमस्ट्री पडद्याशिवाय, ऑफ स्क्रीन सुद्धा दिसून येते. दोघेजण अनेक ठिकाणी सोबत दिसून येता. व त्यानंतर सगळ्यांना वाटले की, ते दोघे नातेसंबंधात आहेत.
ईशान खट्टर आत्ताच नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये सामील झाले. शोमध्ये नेहा धुपियाने  ईशान खट्टरला त्याच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले.  त्यावेळी ईशानला विचारले की जान्हवी आणि तुझ्यामध्ये काही चालू आहे का, त्यावेळी ईशान म्हणला की मी जान्हवी सोबत रिलेशनशिप मध्ये नाही पण कॉफी सोबत आहे. बियोंड द क्लाउडचा अभिनयात पदार्पण केल्यानंतर ईशान खट्टरने सांगितले की त्याला कशा प्रकारची गर्लफ्रेंड पाहिजे, तेंव्हा ईशान म्हणला ”मला अशी मुलगी पाहिजे की ती प्रामाणिक असली पाहिजे आणि दृष्टीपासून बाहेर हवी आणि लहान असली पाहिजे. मी माझ्या मित्रातही अशीच गुणवत्ता बघतो.
आत्ताच ते दोघं करण जोहरच्या चॅट शोमध्ये वेगळे वेगळे आले होते. ईशान  त्याचा भाऊ शाहिद कपूर सोबत आला होता तर, जान्हवी तिचा भाऊ अर्जुन कपूर सोबत आली होती. त्यावेळी करणने ईशानला प्रश्न विचारला की  तू आणि जान्हवी  रिलेशनशिपमध्ये आहात का त्यावर ईशान म्हणला ‘नाही’ पण आम्ही दोघे सोबत फिरतो, सोबत जिमला जातो आणि चित्रपट पाहायला जातो. नंतर परत तोच प्रश्न करणने जान्हवीला विचारला तर ती म्हणली मी सहकलाकारासोबत डेटिंग करत नाहीये आणि त्याचे व माझे कुठलेच प्रेमाचे संबंध नाही. हे दोघे जान्हवी कपूरचा पुढचा चित्रपट ‘कारगिल गर्ल’  चा शूटिंग मध्ये  मग्न आहेत.
You might also like