‘भाईजान’ सलमानच्या फार्म हाऊसचं ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळं नुकसान ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं काही ठिकाणी खूप नुकसान झालं आहे. अनेक भागात तर लोक वीज, पाणी अशा काही बेसिक सुविधांसाठी परेशान आहेत. बॉलिवूड स्टार सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसचंही खूप नुकसान झालं आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

सलमानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनं चक्री वादळानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळं झालेलं नुकसान यात स्पष्ट दिसत आहे. युलियानं काही फोटो तिच्या इंस्टा स्टोरीवरून शेअर केले आहेत. सध्या हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

समोर आलेल्या फोटोत आणि व्हिडीओत दिसत आहे की, फार्म हाऊसवरील मोठ मोठी झाडं कोलमडून पडली आहेत. आणखीही बराच राडा झाल्याचं दिसत आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like