‘बच्चन पांडे’मध्ये सामिल झाली जॅकलीन फर्नांडिस ! दिसणार एकदम नवा अवतार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट ॲक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) अनेकदा आपले बिकीनी फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. आपल्या बिकीनी फोटोंमुळे ती खूपदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. एका मुव्हीमुळं जॅकलीन चर्चेत आली आहे. साजित नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) याचा ॲक्शन कॉमेडी सिनेमा बच्चन पांडे (Bachchan Pandey) मधील स्टार्सच्या यादीत आता जॅकलीन फर्नांडिसचं नाव ॲड झालं आहे. खुद्द जॅकलीननं याबाबत माहिती दिली आहे. खास बात अशी की, यात ती एकदम नव्या अवतारात दिसणार आहे असंही तिनं सांगितलं आहे.

जॅकलीननं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. फोटो सोबत तिनं लिहिलं की, साजिद नाडियाडवाला सोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. जुडवां आणि हाऊसफुलनंतर बच्चन पांडे हा आम्ही सोबत काम करत असलेला 8 वा सिनेमा आहे. अक्षय कुमार सोबत रियुनियनची आतुरतेनं वाटत पहात आहे.

जॅकलीन असंही म्हणाली की, मी आताच एका सिनेमाची शुटींग पूर्ण केली आहे. दुसऱ्याची सुरू आहे. बच्चन पांडे साठी मी लकवरच शुटींग सुरू करणार आहे. यानंतर मी पुन्हा साजिद द्वार डायरेक्टेड सलमान खान आणि माझा सिनेमा किक 2 कडे वळेन.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar), कृती सेनन (Kriti Sanon), अरशद वारसी (Arshad Warsi) असे काही कलाकार काम करताना दिसणार आहे. अक्षयनं यात बच्चन पांडेची भूमिका साकारली आहे जो एक गँगस्टर आहे.

You might also like