नोव्हेंबरच्या थंडीत जॅकलीन फर्नांडिसचं Topless फोटोशूट ! लोक म्हणाले ‘ताई कपड्यांचे पैसे…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) अनेकदा आपले बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. आपल्या बिकिनी फोटोंमुळे ती खूपदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. पुन्हा एकदा जॅकलीननं काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशलवर चर्चेत आहेत. परंतु यामुळं तिला ट्रोलही केलं गेलं आहे.

जॅकलीननं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती सुपरहॉट अवतारात दिसत आहे. समोर आलेल्या फोटोत जॅकलीन टॉपलेस दिसत आहे. यात तिनं एका कापडानं अंग झाकलं आहे. तिचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. जॅकलीनचे हे फोटो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

जॅकलीनच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर भरपूर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या लुक आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. परंतु काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.

नोव्हेंबरच्या थंडीत असं हॉट फोटोशूट पाहून लोक तिला कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत. एकानं तर खूपच खोचक कमेंट करत लिहिलं की, ताई कपड्यांचे पैसे माझ्याकडून घ्यायचे होते.

जॅकलीन सोशल मीडियावर चर्चेत येणं यात नवीन असं काहीच नाही. नेहमीच तिचा एखादा हॉट फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतच असतो.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती जॉन अब्राहमच्या अटॅक या सिनेमात दिसणार आहे. सध्या तिच्याकडं भूत पोलीस, किक 2 आणि सर्कस हे सिनेमेदेखील आहेत. याआधी ती मिसेज सिलियर किलर या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. 2009 साली आलेल्या अलादीन या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं.

 

You might also like