जॅकलीन फर्नांडिसला मिळाला सल्ला- ‘करिअर बनवायचं असेल तर नाव बदल आणि नाकाची सर्जरी कर’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस हिनं 2006 साली मिस युनिव्हर्स श्रीलंका किताब जिंकला. आज बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिला खूप स्ट्रगल करावा लागला. तिला अनेकांनी वेगवेगेळे सल्लेही दिले आहेत. कोणी तिला नाव बदलायला सांगितलं तर कोणी तिला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला. खुद्द जॅकलीननं एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. अ‍ॅक्ट्रेस असल्यानं कसं तिला दुप्पट भाडं द्यावं लागलं आहे हेही तिनं सांगितलं आहे.

जॅकलीन फर्नांडिस म्हणाली, “मी जेव्हा मी सुरुवातीला इंडस्ट्रीत आले होते तेव्हा मला जास्त चिंता नव्हती. मला माझ्या खरेपणासोबत राहायचं होतं. मी आल्यानंतर सुरुवातीला मला अनेक लोकांनी अनेक सल्ले दिले. कोणी मला नाकाची सर्जरी करायला सांगितली तर कोणी मला माझं नाव बदलायला सांगितलं. परंतु मी स्वत:ला प्रश्न केला की, खरंच मला हे सगळं करण्याची गरज आहे का. मी खूप शांत आणि रिलॅक्स होते. परंतु मी आता काही प्रमाणात यशस्वी झाले आहे. मी एका टप्प्यावर आले आहे. तर मला आता या गोष्टीची चिंता असते की, हे कायम ठेवण्यासाठी मला काय करायला हवं ?”

पुढे बोलताना जॅक म्हणते, “मला सांगण्यात आलं होतं की, तुझं नाव मुस्कान ठेव. माझ्या एजन्सीनंही मला सांगितलं की, तुझं नाव बऱ्याच प्रमाणात वेस्टर्न आहे. अशानं तुझं काम कसं होईल. काहींनी मला माझ्या आयब्रो डार्क करण्याचाही सल्ला दिला. अशा अनेक विचित्र गोष्टी मला सांगण्यात आल्या. नाकाच्या सर्जरीचं ऐकल्यानंतर तर मला हसूच आलं होतं. कारण हे एक असं फीचर होतं जे मला चांगलं वाटत होतं. मला माझं नाक आवडतं.”

जॅकलीन म्हणाली, “एक वेळ अशी होती की, मला खूप वाईट वाटलं होतं. एक दिवाळी पार्टी होती ज्या मी पारंपरिक वेशात आले होते. माझे तीन अ‍ॅक्टर फ्रेंड मला पाहून म्हणाले, “तू एवढे प्रयत्न का करत आहेस. तू इंडियन नाहीयेस. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं.”

https://www.instagram.com/p/B437_qEnBo4/