वहिदा रहमानच्या गाण्यावर जान्हवी कपूरचा जोरदार डान्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. याच वर्षी जान्हवी 3 बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. परंतु त्याआधीच ती आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सध्या जान्हवीच्या या व्हिडीओची खूप चर्चा सुरू आहे. या व्हिडीओत ती वहिदा रहमानच्या एका क्लासिक गाण्यावर शानदार डान्स करताना दिसत आहे.

जान्हवी कपूरनं नुकताच तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सोशलवर चर्चेत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, जान्हवी वहिदा रहमानच्या पिया तोसे नैना लागे रे या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत जान्हवीसोबत आणखी एक लेडी दिसत आहे. जान्हवीचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर जान्हवीनं ब्लू आणि व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस घातला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिचा डान्स आणि लुक दोन्ही आवडलं आहे.

व्हिडीओ पाहून असेही अंदाज लावले जाताना दिसत आहे की, जान्हवी आपल्या आगामी सिनेमात डान्सिंग नंबर करताना दिसण्याची शक्यता आहे. याचसाठी ती स्वत:ला तयार करत आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B8S3pJPAKNx/

https://www.instagram.com/p/B8EhSH8g7Ql/