Video : जान्हवी कपूरचा ‘बेली डान्स’ सोशलवर तुफान व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेकदा तिच्या फोटोशुटमुळं चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या बोल्डनेसमुळं तिनं अनेकदा सोशलवर अटेंशन घेतलं आहे. पुन्हा एकदा तिचा डान्स व्हिडीओ समोर आल्यानंतर ती चर्चेत आली आहे. खास बात अशी की, जान्हवीचा हा डान्स बेली डान्स आहे.

जान्हवी कपूरनं तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सोशलवर चर्चेत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, जान्हवी बेली डान्स करत आहे. अशोका सिनेमातील गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे. तिनं व्हाईट कलरचा आउटफिट घातला आहे.

जान्हवीचा हा बेली डान्स वाला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांनाही तिच्या स्टेप्स खूप आवडल्या आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रूही अफजाना या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. अलीकडेच जान्हवीनं गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम केलं आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त हा सिनेमादेखील आहे. आता ती गुड कल जेरी या सिनेमावर काम करत आहे.