दिल्ली हिंसा : जावेद अख्तर यांचा दिल्ली पोलिसांना सवाल, म्हणाले – ‘फक्त ताहिरच का ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि दिग्गजांपैकी एक गीतकार जावेद अख्तर यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कामाकाजावर सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी नलंबित करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावरून त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आले आहेत. अनेकांनी त्यांना सुनावलं आहे.

जावेद अख्तर यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “अनेकजण मेले. अनेकजण जमखी झाले. अनेक दुकानं लुटले गेले. अनेक लोक असहाय्य झाले. दिल्ली पोलिसांनी एक घर सिल केलं आहे आणि त्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. योगायोगानं त्याचं नाव ताहिर आहे. दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेपुढे मी नतमस्तक झालो आहे.”

https://twitter.com/desertfox61I/status/1233034083770552321

जावेद अख्तर वेळोवेळी आपलं मत मांडताना दिसत असतात. अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे लोकांच्या निशाण्यावरही आले आहेत. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांवर ज्याप्रमाणे टीका केली आहे यानंतर अनेकजण त्यांच्यावर नाराज झाल्याचं दिसत आहे. ते निलंबित केलेल्या नगरसेवकाच्या बाजूनं तर बोलत नाहीत नां असा सवाल उपस्थित केला जाताना दिसत आहे.

सीएएच्या विरोधात आंदोलनानं अलीकडेच हिंसक वळण घेतलं आहे. या हिंसाचारात 38 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आम आदमी पार्टीचे ताहिर हुसैन यांच्या खजुरी खास मधील फॅक्टरीला सील केलं आहे. ताहिर हुसैनविरोधात दयालपूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत खुनाची केस दाखल करण्यात आली आहे. आपचे नगरसेवक ताहिरवर आयबीचे अधिकारी अंकित शर्माच्या खुनाचाही आरोप आहे.