‘जजमेंटल है क्या ?’ चित्रपट रिलीज होण्यापुर्वीच कंगनाची भूमिका ‘लीक’ झाल्यानं ‘बोंबाबोंब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कंगना रनौत नेहमी आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी चर्चेत असते. ‘मणिकर्णिका’ मध्ये कंगना तलवार चालवताना दिसली तर आता ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटातून एक वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटात कंगना एका वॉइस ओवर आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना आपल्या कलाकृतीसाठी प्रसिद्ध आहे. कंगनाला देण्यात आलेल्या प्रत्येक भूमिकेत ती खोलवर जाते म्हणूनच ती प्रेक्षकांच्या मनावर राज करते.

चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे आणि प्रेक्षकांना कंगनाचा हा अनोखा अंदाज आवडला आहे. यात कंगना एका वॉइस ओवर आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहे. या आधी ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘मणिकर्णिका’ मध्ये त्यांच्या अभिनयानी त्यांनी प्रेक्षांची प्रशंसा मिळवली होती. आता येणाऱ्या चित्रपटात हि असेच होणार हे ट्रेलर वरून दिसत आहे.

वॉइस ओवर आर्टिस्टच्या भूमिकेबद्दल कंगना म्हणाली, अशी ही भूमिका मी पहिल्यांदाच साकारली आहे. या आधी मी अशी भूमिका साकारली नाही. यामध्ये प्रकाशनी माझी खूप मदत केली आहे. याच व्यतिरिक्त खूप साऱ्या लोकांनी मला आवाजाचे विविध एक्सरसाइज आणि वॉइस मॉड्यूलेशन मध्येही मदत केले आहे. ज्याने ही भूमिका साकारायला खूप मदत झाली.

कंगना आपल्या या भूमिके बद्दल सांगताना म्हणाली, मी यात भोजपुरी आणि साउथ इंडियन चित्रपटाचे डबिंग करताना दिसेन. जीभ आणि गळ्यासोबतच कंगनाने टंग ट्विस्टरचा अभ्यास केला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात असे अनेक दृश्य पाहायला मिळेल जिथे कंगना आणि राजकुमार राव टंग ट्विस्टरच्या माध्यमातून आपापल्यात बोलताना दिसणार आहेत. या टंग ट्विस्टरमुळेच चित्रपटात खूप साऱ्या कॉमिडी दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ‘बटाटा’ लावा आणि मिळवा ‘तजेलदार’ त्वचा

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

युती, आघाडीच्या अडचणी वाढल्या ;वंचित’ यामुळे बदलणार या पाच मतदारसंघांचं गणित

जातिवाचक शिवीगाळ करणे पडले महागात, मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिकेला कैद

You might also like