‘भाईजान’ सलमान आणि ‘किंग खान’ शाहरूखला देखील शाहिद कपूरनं ‘या’ बाबतीत मागं सोडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कबीर सिंह’ हा स्टार चित्रपट बनला आहे. यासोबतच हा चित्रपट शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा आणि यशस्वी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे रविवारी एकूण कलेक्शन २३५.७२ कोटी इतके झाले आहे आणि हा चित्रपट आता २५० करोडच्या जवळ पोहचत आहे. सोमवारी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आणि काही दिवसातच हा चित्रपट २५० कोटीपर्यंत पोहचेल. या चित्रपटाने सोमवारी ४.२५ कोटीची कमाई केली.

सोमवारचे कलेक्शन यात मिळवले तर एकूण चित्रपटाने २३९ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेकांचे रेकॉर्ड तोडले आहे. हा चित्रपट सलमान खानचा ‘किक’ आणि शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाच्या कलेक्शनच्या पुढे पोहचला आहे. ‘किक’ चित्रपटाचे कलेक्शन २३१.८५ कोटी आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ चे कलेक्शन २२७.१३ कोटी झाले होते. आता टारगेट आहे रणवीर सिंगचा ‘सिंबा’ व विक्की कौशलचा ‘उरी’. सिंबा चित्रपटाचे कलेक्शन २४०.३१ झाले होते व ‘ उरी द सर्जिकल स्ट्राइक ‘ चे कलेक्शन २४५ कोटी झाले होते. लवकरच ‘कबीर सिंह’ हा आकडा पार करेल.

‘कबीर सिंह’ चित्रपट २१ जूनला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तेलगू सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. या चित्रपटाने १३४.४२ कोटीची कमाई केली होती.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक