‘कबीर सिंह’ने ४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी ; लवकरच ‘त्या’ क्‍लबमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टारर कबीर सिंह या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. या सिनेमाचं ओपनिंग विकेंड कलेक्शन ७.८३ कोटी झालं आहे. हा सिनेमा म्हणजे शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वात अप्रतिम सिनेमा सिद्ध झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या चौथ्या दिवसाबद्दल सांगायचे झाले तर, या सिनेमाने चौथ्या १७.५ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. असा अंदाज लावला जात आहे की, रिलीजच्या पाचव्या दिवशी हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल.

कबीर सिंह शाहिदच्या करिअरमधलील सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने एकूण ८८.३७ कोटी कमावले आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी कमावल. अशा प्रकारे केवळ दोनच दिवसात या सिनेमाने ४२.९२ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने २७.९१ कोटींची बंपर कमाई केली. चौथ्या दिवशी १७.५४ कोटींची कमाई करत कबीर सिंहने ७०.८३ कोटीचं ओपनिंग विकेंड कलेक्शन केलं आहे.

कबीर सिंह हा सिनेमा भारतात एकूण ३१२३ स्क्रीनवर रिलीज करण्यात आला होता. ओवरसीज बद्दल बोलायचे झाले तर, ४९३ स्क्रिन या सिनेमाला मिळाल्या होत्या. वर्ल्ड वाईड हा सिनेमा एकूण ३६१६ स्क्रीनवर रिलीज झाला होता. या वर्षात रिलीज झालेल्या सिनेमांपैकी ओपनिंगबाबत कबीर सिंह चौथ्या क्रमांकावर आहे. याबाबत भारत सिनेमाविषयी बोलायचे झाले तर, भारत सिनेमा ४२.३० कोटींची ओपनिंग करत एकदम टॉपला आहे. यानंतर कलंक सिनेमा २१.६० कोटींची कमाई करत चौथ्या क्रमांकावर आहे. केसरीने २१.०६ कोटींनी ओपनिंग केली होती. यानंतर आता कबीर सिंह चौथ्या नंबरवर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’