हैदराबाद रेप केस : कबीर सिंह सिनेमाच्या डायरेक्टरनं दिली ‘ही’ वादग्रस्त प्रतिकिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरसोबत झालेला गँगरेप आणि हत्येप्रकरणी लोकांमधील राग अधिकच वाढताना दिसत आहे. आरोपींना कठोर शासन करण्यासाठी प्रत्येकजण मागणी करताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारही सोशलवर आपला राग व्यक्त करत आहेत. अशातच कबीर सिंग सिनेमाचे डायरेक्टर संदीप वांगा रेड्डी यांनीही याप्रकरणी ट्विट केलं आहे. संदीप यांचं हे ट्विट पाहून लोकं जाम भडकली आणि त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

संदीप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “भीती ती गोष्ट आहे ज्यामुळे समाजाला बदललं जाऊ शकतं. भीती हाच नवीन कायदा व्हायला हवा. आरोपींनी क्रूर शिक्षा नवीन उदाहरण समोर ठेवेल. आता देशातली प्रत्येक मुलीला ठोस गँरंटी हवी आहे. वारंगल पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी यावर कारवाई करावी.” या ट्विटसोबत त्यांनी गँगरेपमधील व्हिक्टीमला श्रद्धांजली दिली. त्यांचं हे ट्विट त्यांच्यावरच उलटलं.

एका युजरनं संदीप यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं की, “लोकहो, मी तुमच्यासमोर सादर करीत आहे एक जिवंत महान आणि ढोंगी मनुष्य. अर्जुन रेड्डी सारखे फ्युडल आणि पेट्रियाकल सिनेमे बनवत रहा आणि विजय देवरकोंडा सोबत संस्कार आणि नियमांचा उपदेश देत रहा.”

Sandeep Venga Reddy
आणखी एका युजरनं म्हटलं की, “कबीर सिंग, अर्जुन रेड्डी यांसारखे सिनेमे बनवून विषारी पुरुषवादाला प्रोत्साहन द्या आणि भीतीविषयी ट्विट करा.” एकानं तर थेट असं म्हटलं की, पोलिसांनी सर्वात आधी तुम्हाला अटक करायला हवी होती.”

Visit : policenama.com

Loading...
You might also like