अभिनेत्री काजल अग्रवालनं शेअर केले ‘HOT’ बिकीनीतले फोटो, चाहते अवाक् !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री
काजल अग्रवाल सध्या चर्चेत आली आहे. सध्या काजल मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. काजलनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहे ज्यात काजलचा खूपच बोल्ड अवतार पहायला मिळत आहे. आपल्या फोटोंमुळे काजल पुन्हा चर्चेत आली आहे. या फोटोत काजलचा बिकीनी लुक समोर आलाय ज्यात ती सेक्सी दिसत आहे.

काजल अग्रवालनं व्हॅकेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत ज्यात काजलनं बिकीनी घातल्याचं दिसत आहे. एका फोटोत काजल फ्लोटींग बलूनवर बसून समुद्रात एन्जॉय करताना दिसत आहे. चाहत्यांनाही काजलचे हे बोल्ड फोटो आवडले आहेत. पूर्वीही काजलनं ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल झाल होते.

काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती इंडियन 2 या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती सुपरस्टार कमल हासनसोबत दिसणार आहे. तिच्याकडे साऊथचे दोन सिनेमे आहेत. याशिवाय काजल मुंबई सागा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/