अ‍ॅक्टर नाही, तर ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात आहे काजल अग्रवाल, नाव ऐकून व्हाल चकित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री काजल अग्रवालचे टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक चाहते आहेत. लाखो चाहेत असणारी काजल कोणासाठी वेडी आहे हे ऐकून तुम्ही चकित व्हाल. त्याचं नाव ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. ज्याच्यासाठी काजल वेडी आहे तो कोणी अ‍ॅक्टर नाही तर भारतीय क्रिकेट टीमचा क्रिकेटर आहे. रोहित शर्मासाठी काजल वेडी आहे.

सध्या साऊथ सिनेमांमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजल अग्रवालकडे पाहिले जाते. साऊथचे सिनेम केवळ तिच्या नावामुळेच हिट होऊन जातात. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्येही काजल झळकली आहे.

काजलचा सिनेप्रवास पाहिला तर तुम्ही मगधीरा या सिनेमाचे नाव नक्कीच ऐकले असेल. मगधीरा हा सिनेमा तिच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा राहिला आहे. बॉलिवूडमधील सिंघम, स्पेशल 26 आणि दो लफ्जोंकी कहानी या सिनेमात तिने काम केलं आहे.

काजल अग्रवाल सोशलवर नेहमी सक्रिय असते. काजल तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशलवर शेअर करत असते. तिच्या सेक्सी फोटो आणि व्हिडीओंना सोशलवर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बिकीनी फोटोही तिने अनेकदा शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांकडून तिच्या बोल्ड अवताराला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते.

क्या या 2004 आलेल्या सिनेमातून काजलने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. यावेळी ती विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या सोबत दिसली होती. परंतु हा सिनेमा खास असा चालला नाही. बॉलिवूमधील सिंघम या सिनेमाने काजलला बॉलिवूडमध्ये ओळख दिली. सिंघम मध्ये ती अजय देवगण सोबत रोमांस करताना दिसली होती. काजलच्या साऊथ करिअरबद्दल सांगायचे झाले तर 2007 मध्ये तिने तेलुगु सिनेमा लक्ष्मी कल्याणम मधून टॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.