काजोलनं ‘कोरोना’च्या भीतीनं मुलगी न्यासाला परत आणलं, भारतात येताच ट्रोलर्स म्हणाले -‘यांच्यापेक्षा कर्मचारी बरे’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येकजण मायदेशी परत येताना दिसत आहे. कोरोनाच्या भीतीनं अभिनेत्री काजोल देवगण हिनंही तिची मुलगी न्यासा हिला सिंगापूरहून परत आणलं आहे. परंतु भारतात पोहोचताच काजोल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

काजोल आणि तिची मुलगी न्यासा भारतात आल्यानंतर एअरपोर्टवर स्पॉट झाली. परंतु दोघींनीही मास्क घातलं नसल्यानं काजोल आणि न्यासा आता ट्रोल होताना दिसत आहेत. काजोल आणि न्यासा यांचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, दोघीही मास्क न घालातच कशा प्रकारे बेजबाबदारपणे एअरपोर्टवरून जात आहेत.

काजोल आणि न्यासावरून अनेक नेटकरी आता कमेंट करत त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांना मास्क न घालण्यावरून प्रश्न विचारले आहेत. एकानं तर अशीही कमेंट केली की, या दोघींपेक्षा तर विमानतळावरील कर्मचारी जास्त सतर्क आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढी जनजागृती केली जात आहे. अनेक स्टार्स हात स्वच्छ धुण्याबाबत आणि मास्क लावण्याबाबत सांगत आहेत. तरीही एक मोठी अभिनेत्री मात्र बेजबाबदार वागत आहे हे नेटकऱ्यांना काही आवडलं नाही.

https://www.instagram.com/p/B6oD68chSG7/

https://www.instagram.com/p/B01a7eMgDDZ/

https://www.instagram.com/p/B8BqOWABFrP/

https://www.instagram.com/p/BmGq8k0gQ5O/