Kamal Hassan Admitted to the Hospital : कमल हासन रुग्णालयात भरती ! जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेते आणि अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांच्या पायाची सर्जरी झाली आहे. कमल हासन यांच्या उजव्याा पायाच्या हाडामध्ये इंफेक्शन झालं आहे. याचीच सर्जरी नुकतीच झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून कमल हासन यांचं मेडिकल बुलेटीन देखील जारी करण्यात आलं आहे.

कमल हासन सध्या श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये ॲडमिट आहेत. रुग्णालयानं प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये सांगण्यात आलं आहे की, कम हासन यांच्या पायाच्या हाडात हलकं संक्रमण झाल्यानं सर्जरी करण्याचं लक्षात घेत त्यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. टिबियल हाडात झालेलं संक्रमण हटवण्यासाठी ही सर्जरी झाली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अनेकांना माहित नसेल की, काही दिवसांपूर्वी कमल हासन यांच्या पायाला इजा झाली होती. यामुळं संक्रमण झालं होतं. आता याचीच सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी आता त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

कमल यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते इंडियन 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहेत. एस शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत.