‘जेव्हा कंगना बेघर होती तेव्हा 3 महिने तिला खायाला-प्यायला घातलं, नंतर वसूल केले 1 कोटी’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म 23 मार्च 1987 रोजी झाला आहे. आज ती आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. जेव्हा ती मुंबईत आली आणि स्ट्रगल करत होती तेव्हा तिची मैत्री आदित्य पांचोली सोबत झाली. नंतर त्याच्यावर रेपचा खटला दाखल करण्यात आला. त्याच्यावर आरोप आहेत की त्यानं तिच्या निष्पापणतेचा फायदा उचलला. कंगनाची बहिण रंगोली चंदेलनं अनेक पोस्ट शेअर करत कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय या मुद्द्यावर रंगोलनीनं पूर्वी भाष्य केलं आहे. तिनं अनेक खुलासे केले होते.
image.png

रंगोलीनं आदित्य पांचोलीवर आरोप लावले होते की, त्यानं कगनाकडून जबरदस्तीनं एक कोटीहून अधिकची रक्कम घेतली होती. रंगोलीनं सांगितलं की, तिनं आदित्यविरोधात 2007 मध्ये शारीरिक शोषण, छळ आणि जबरदस्तीनं पैसे वसूल करण्याची तक्रार दाखल केली होती. कंगनानं त्याला एक कोटीहून अधिकची रक्कम हे सांगत दिली होती की, त्यानं कंगनाला 3 महिन्यांपर्यंत खायला घातलं होतं जेव्हा ती बेघर होती. 3 महिन्यांची एक कोटी रक्कम ऐकून रंगोलीही चकित झाली होती. त्यानं केलेले पैसे वसूलीच शेवटचा मेसेज मी स्वत: पाहिला आहे असंही रंगोली म्हणाली.
image.png

दरम्यान आदित्या पांचोली यानं मात्र सर्व आरोपाचं खंडन करत ते नाकारले होते. उलट तो म्हणाली की, मी कंगनाची त्या काळात मदत केली जेव्हा ती बेघर होती. त्यांन तिला खायला घातल्याचंही सांगितलं.

image.png