कंगनानं हिमांशी खुरानाला Twitter वर केलं ‘ब्लॉक’ ! स्क्रीनशॉट शेअर करत अ‍ॅक्ट्रेस म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेत आहे. याआधीही कंगनानं शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकिस दादी सोबत केली होती. यानंतर ती ट्रोल झाली आणि तिनं ते ट्विट डिलीट केलं. बिग बॉस 13 (Bigg Boss 13) ची स्पर्धक आणि पंजाबी अ‍ॅक्ट्रेस हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिनं ट्विट करत कंगनावर निशाणा साधला होता. यानंतर कंगनानं हिमांशीला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे.

काय म्हणाली होती हिमांशी ?
कंगनाच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना हिमांशी खुरानानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं लिहिलं की, ओह म्हणजे आता ती नवीन स्पोकपर्सन आहे. एखाद्या गोष्टीला चुकीचा अँगल देणं कुणी यांच्याकडून शिकलं पाहिजे. जेणेकरून उद्या ही लोकं काही करतील, त्याआधीच लोकांमध्ये कारण पसरवून दिलं की, का दंगे होतील. स्मार्ट आणि ना पहिल्या गव्हर्न्मेंटपासून लोक खूश होती आणि नाही आता. जर आमच्या सीएम साहेबांनी येऊन केलं तर ते स्वत: थंडीत रस्त्यावर नसते उतरले.

यानंतर कंगनानं हिमांशीला ब्लॉक केलं आहे. हिमांशीनं याचा एक स्क्रीनशॉट इंस्टा स्टोरीला शेअर केला आहे. यात कंगनानं तिला ब्लॉक केल्याचं दिसत आहे. हिमांशीनं लिहिलं की, ब्लॉक केलंय.

You might also like