कंगनानं शेहला राशीद प्रकरणावर केलं Tweet ! म्हणाली – ‘मी तर जन्मत:च मुर्ख आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिनं जेएनयु विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला राशीद शोरा (Shehla Rashid Shora) वर लावण्यात आलेल्या टेरर फंडिंगच्या आरोपांवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शेहला राशीदचे वडिल अब्दुल राशीद शोरा (Abdul Rashid Shora) यांनी जम्मू काश्मीरच्या डीजीपींना पत्र लिहित मुलीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी असाही दावा केला आहे की, मुलगी शेहला कडून त्यांच्या जीवाला धोका आहे. शेहलाच्या वडिलांच्या याच विधानावर कंगनानं प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनानं अब्दुल राशीद शोरा यांचा एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. यात ती लिहिते की, देशद्रोहातून तुम्हाला पैसा, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, सहयोग आणि सर्व काही मिळेल परंतु देशप्रेमातून तुम्हाला दुश्मन मिळतील. वारश्यात पूर्वज संस्कृतीची लढाई मिळेल. तुमचं आयुष्य आहे तुमचा निर्णय असायला हवा. समजदारपणाचं आयुष्य जगायचं की, मुर्खतेचं ? मी तर जन्मत:च मुर्ख आहे.

कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या याची खूप चर्चा सुरू आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like