कंगना रनौतच्या ‘धाकड’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर काही मिनिटातच ‘डिलीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत कोणत्यानाकोणत्या कारणामुळे चर्चेत असते, कधी नवीन वाद, तर कधी चित्रपटामुळे. नुकताच तिचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचबरोबर एका नव्या चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. आज, 9 ऑगस्ट रोजी, काही वेळापुर्वीच कंगनाचा चित्रपट ‘धाकड’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीजर प्रदर्शित झाल्याच्या काही मिनिटांतच हा टीझर यूट्यूबवरून डिलीट करण्यात आला हे कळताच लोक आश्चर्यचकित झाले.

कंगना रनौत आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी असे पाऊल का उचलले असे प्रश्न लोकांना पडले आहे. कंगनाचा हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर होताच यूट्यूबवरून काढून टाकल्याची बाब कोणी पचवत नाही. त्याचबरोबर निर्मात्यांनी असे करण्याचे कोणतेही कारण दिले नाही. या टीझरमध्ये कंगना रनौत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. 45 सेकंदाच्या या टीझरमध्ये कंगना मशीनगनसह गोळ्यांचा पाऊस पाडताना दिसत आहे. या टीझरमध्ये कंगना पूर्ण रक्ताने भिजलेली दिसत आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1159708091442581506

या अवतारसाठी कंगनानेही विशेष प्रशिक्षण घेतले आहे. जर पाहिले तर कंगना तिच्या पात्रांविषयी जोरदार एक्सपेरिमेंट करीत आहे. ‘मणिकर्णिका’ मध्ये झांसीची रानी, ‘जजमेंटल है क्या’ क्रेझी मुलगी आणि आता कंगनाने ‘धाकड’ मध्ये धमाकेदार अ‍ॅक्शन करुन सर्वांनाच चकित केले. त्याचबरोबर या चित्रपटाविषयी ट्विटरवरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही जण आपत्ती म्हणत आहेत तर काही सुपरहिट फिल्म म्हणत आहे.
kangana
या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील बरीच लोकेशन्स व्यतिरिक्त हाँगकाँग आणि थायलंडमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. रजनीश राजी घई या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. टीझरमध्ये सांगण्यात आले आहे की, हा चित्रपट वर्ष 2020 मध्ये दिवाळीनिमित्त प्रदर्शित होईल.

आरोग्यविषयक वृत्त