कंगनाचा दिलजीत दोसांझवर ‘पलटवार’, म्हणाली – ‘ए करण जोहरच्या पाळीव…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेत आहे. याआधीही कंगनानं शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकीस दादी सोबत केली होती. यानंतर ती ट्रोल झाली आणि तिनं ते ट्विट डिलीट केलं होतं. कंगनानं असा दावा केला होता की, हे 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात. यानंतर अनेक पंजाबी सेलेब्सनं तिच्यावर टीका केली. अ‍ॅक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यानंही ट्विट करत कंगनावर निशाणा साधला होता. याला आता कंगनानं उत्तर दिलं आहे. कंगनानं दिलजीतला करण जोहरचा पाळीव म्हणन संबोधलं आहे.

फोटोतील दोन्ही वृद्ध महिला बिलकीस दादी असल्याचं कंगनानं सांगितलं होतं. परंतु त्यातील एक बिलकीस बानो आणि एक भटींडाच्या बहादूरगड जांदियां गावात राहणाऱ्या महिंदर कौर होत्या.

दिलजीतनं महिंदर कौर यांचा व्हिडिओ शेअर ट्विट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं की, एखाद्यानं एवढंही आंधळं होऊ नये. काहीही बोलत फिरत असते.

यानंतर आता कंगनानं त्याला उत्तर दिलं आहे. कंगनानं हेच ट्विट रिट्विट करत लिहिलं की, ए करण जोहरच्या पाळीव…., जी आजी शाहीन बागेत आपल्या नागरिकतेसाठी आंदोलन करत होती, तीच बिलकीस बानो आजी शेतकरी आंदोलनात एमएसपीसाठी आंदोलन करताना दिसली. महिंदर कौरजींना तर मी ओळखतही नाही. काय ड्रामा चालवलाय तुम्ही लोकांनी. हे सर्व आता बंद करा.

 

 

You might also like