कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर BMC चा छापा , अभिनेत्री म्हणाली – ‘माझे स्वप्न कोसळणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सोमवारी कंगना रनौतला गृहनिर्माण मंत्रालयाने Y-वर्ग सुरक्षा देण्याची घोषणा केली होती, दुसरीकडे मुंबईत कंगनाच्या प्रॉडक्शन कंपनीच्या कार्यालयावर बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीने छापा टाकला होता. बीएमसीचे अधिकारी कंगनाच्या कार्यालयात बेकायदा बांधकामांची चौकशी करत आहेत. कंगना म्हणाली की, तिने काहीही बेकायदेशीर केले नाही. ट्विटरच्या माध्यमातून कंगनाने छाप्याची माहिती दिली. ट्विटमध्ये लिहिले- हे मुंबईतील मणिकर्णिका चित्रपटांचे ऑफिस आहे, जे मी पंधरा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर कमावले आहे. माझ्या आयुष्यात माझे एकच स्वप्न होते, जेव्हा मी चित्रपट निर्माता होईल, तेव्हा माझे स्वतःचे कार्यालय असावे. पण असे दिसते की, हे स्वप्न मोडण्याची वेळ आली आहे. आज अचानक बीएमसीचे काही लोक तिथे आले आहेत.

कंगनाने पुढे लिहिले- त्यांनी माझ्या कार्यालयावर जबरदस्तीने कब्जा केला आहे. माझे शेजाऱ्यांनी जेव्हा निषेध केला, तेव्हा त्यांना धमकविण्यात आले. त्याची भाषा अशी होती – ती जी मॅडम आहे, तिच्या वागण्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागेल. मला सांगण्यात आले आहे की, उद्या माझी प्रॉपर्टी जमीनदोस्त केली जाईल. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. बीएमसीच्या परवानग्या आहेत. माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदेशीर नाही. महापालिकेने बेकायदा बांधकाम दर्शविण्यासाठी स्ट्रक्चर योजनेसह नोटीस पाठवावी. आज त्यांनी पूर्वसूचना न देता माझ्या जागेवर छापा टाकला आहे, उद्या ते पाडूनदेखील टाकतील. कंगनाने ट्वीटसमवेत व्हिडिओही शेअर केला असून, त्यात बीएमसीचे लोक तपासणी करताना दिसत आहेत.

48 कोटींचे कंगनाचे ऑफिस

मुंबईच्या पॉली हिल भागात कंगनाने यंदा जानेवारीत आपल्या शानदार ऑफिसची सुरूवात केली. माहितीनुसार , कंगनाच्या कार्यालयाची किंमत सुमारे 48 कोटी रुपये आहे. पाली हिल येथील बंगला क्रमांक 5 चे कार्यालयात रूपांतर करण्यात आले आहे. कंगनाने आपला ड्रीम स्टुडिओ आणि ऑफिस तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याचे इंटिरियर डिझायनर शबनम गुप्ता यांनी डिझाइन केले होते. याची झलक मॅगझिनच्या फोटोशूटमधून समोर आली.

दरम्यान, कंगना आजकाल अनेक कारणांनी चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुरुवातीला ती खूपच चर्चेत आली. कंगनाने सुशांतच्या मृत्यूला नेपोटीझम आणि कथित बॉलिवूड माफियांच्या दादागिरीचा जबाबदार ठरविले. या प्रकरणात ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर कंगनानेसोशल मीडियावर काही बॉलिवूड स्टार्सना त्यांची ब्लड टेस्ट करुन घेण्यास सांगितले.