Video : महापौर किशोरी पेडणेकर कंगना रणौतला म्हणाल्या ‘2 दमडीचे लोक’ ! अभिनेत्रीनं केला जोरदार ‘पलटवार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या मुंबईमधील ऑफिसात 9 सप्टेंबर रोजी बीएमसीनं बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत तोडफोड केली होती. यावर आता मुंबई हायकोर्टानं (HIGH COURT OF BOMBAY) निर्णय दिला आहे. कोर्टानं म्हटलं आहे की, बीएमसची ही अ‍ॅक्शन सूडाच्या भावनेतून घेतली आहे. या तोडफोडीसाठी आता बीएमसीनं नुकसानभरपाई द्यायची आहे, असंही कोर्टानं सांगितलं आहे. यानंतर कंगनानं आनंद व्यक्त केला होता. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. पेडणेकरांनी कंगनासाठी अपशब्द वापरले आहेत. कंनगानं यावर ट्विट करत आता पलटवार केला आहे. सध्या कंगनाचं ट्विट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

काय म्हणाली कंगना ?

आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणते, गेल्या दिवसात मी महाराष्ट्र सरकारकडून एवढ्या लीगल केस, शिव्या, अनादर आणि बदनामी सहन केली आहे की, बॉलिवूड माफिया आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखी लोकंही मला भली माणसं वाटायला लागली आहेत. मला कळेना माझ्यात असं काय आहे की, जे लोकांना परेशान करतंय.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

कोर्टाचा निर्णय आल्यानंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, सर्व लोक चकित आहेत की, एक अ‍ॅक्ट्रेस जी हिमाचलमध्ये राहते, इथं येते आणि आपल्या मुंबईला POK म्हणते. अशी दोन दमडीचे लोक न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू इच्छित आहेत. हे चुकीचं आहे. कंगनाचा बंगला तोडण्याची कारवाई ही नियमांप्रमाणे करण्यात आली होती. हायकोर्टाच्या निर्णयावर लवकरच BMC च्या कायदेशीर टीमसोबत बैठक घेतली जाईल.

You might also like