Kangana Ranaut ला सपोर्ट करण्यासाठी आले ‘सोनू निगम’, संजय राऊत यांच्या वक्तव्यास म्हणाले ‘लाजिरवाणे’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतबद्दल काही अपशब्द बोलले होते, त्यानंतर अभिनेत्रीने त्यांचा उघडपणे विरोध केला आणि आव्हान केले की त्या 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेधही केला जात आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीही आक्षेप नोंदविला आहे. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनीही संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर कंगनाला हे सर्व ऐकून घेतल्याबद्दल सॉरी म्हटले आहे.
सोनू निगमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते संजय राऊत यांनी कंगनासाठी बोललेल्या अपमानास्पद शब्दांची पुनरावृत्ती करत आहेत. व्हिडिओमध्ये सोनू पुन्हा पुन्हा तोच अपशब्द बोलताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच सिंगरने लिहिले, ‘हरामखोर? कंगना? खरोखर? शर्मनाक…महिलांविरूद्ध केलेले लाजिरवाणे वक्तव्य. सॉरी कंगना.’ दरम्यान यापूर्वीही रणवीर शौरी, अनुभव सिन्हा, दिया मिर्झा यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला होता.
संजय राऊत यांच्या विधानाचा दिया मिर्झाने देखील निषेध केला होता आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले. दियाने ट्विट करत लिहिले होते की, ‘संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दांचा मी तीव्र निषेध करते. कंगनाने जे म्हटले त्यावर राग व्यक्त करण्याचा आपणास पूर्ण हक्क आहे, परंतु अशी भाषा वापरल्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.’
संजय राऊत यांच्या विधानावर कंगनाने उत्तर दिले होते की, ‘मी 9 सप्टेंबरला येत आहे… आपले लोक मला सांगत आहेत की माझा जबडा फाडण्यात येईल, मला ठार मारतील… तुम्ही मला मारावे? कारण या देशाची जी माती आहे ती अशाच रक्ताने भिजली आहे आणि या देशाच्या प्रतिष्ठेसाठी व सन्मानासाठी अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.’