‘भांडणाची सुरुवात मी नाही करत, परंतु संपवते मीच’, कंगनाचा शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडेच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या 48 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या ऑफिसवर बुलडोझर चालवला होता. यानंतर कंगनानं शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कंगनानं पुन्हा एक ट्विट केलं आहे ज्यात तिनं नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘मी भांडण सुरू करत नाही, परंतु संपवते’
कंगनानं ट्विट करत लिहिलं की, “मी भांडण करणारी मुलगी वाटू शकते. परंतु हे सत्य नाही. माझं हे रेकॉर्ड आहे की, मी कधीही भांडणाची सुरुवात केलेली नाही. जर कुणी या गोष्टीला चुकीचं सिद्ध केलं तर मी ट्विटर सोडेन. मी कधीच भांडण सुरू करत नाही. परंतु संपवते मीच. भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की, जेव्हा तुमच्यासोबत भांडायला कुणी तयार असेल तर तुम्ही कधीही त्यांना नाही म्हणू नये.”

बीएमसीवर वार
कंगनानं गुरुवारी तिच्या मोडक्या ऑफिसचे काही फोटो ट्विटरवरून शेअर केले होते. यात ती म्हणाली होती की, “हा तिच्या स्वप्नांचा, सन्मानाचा आणि धैर्याचा बलात्कार आहे.”

याव्यतिरीक्त कंगनानं आणखीही ट्विट करत तिचं दु;ख मांडलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, बीएमसीच्या कारवाईत कंगनाचं 2 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कंगनाच्या या 3 मजली ऑफिसला उभारण्यासाठी साधारण 48 कोटी रुपये लागले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like