AIIMS चे डायरेक्टर डॉ. गुलेरिया यांनी घेतली ‘कोरोना’ची लस ! कंगनानं व्यक्त केली उत्सुकता, म्हणाली… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशात नुकतीच कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, AIIMS चे डायरेक्टर डॉ.रनदीप गुलेरिया यांनीही लस घेतली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिनं हा व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे आणि तिची एक्साईटमेंट बोलून दाखवली आहे.

कंगनानं ANI चा व्हिडीओ ट्विटरवरून रिट्विट करत लिहिलं की, अद्भूत. मी आता आणखी वाट पाहू शकत नाही. कंगनाची एक्साईटमेंट पाहून असं वाटत आहे की, तीही लवकरच कोरोनाची लस घेणार आहे.

कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी तिचं हे ट्विट शेअर देखील केलं आहे. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.