अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेल नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. कंगना बद्दल कोणी काही बोलायचं उशीर असतो की, रंगाली त्या व्यक्तीचा समाचार घेण्यास तयारच असते. अशातच तिने आता अभिनेत्री दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे.

रंगोलीने याबाबत एक पोस्ट रिट्विट करत लिहिले आहे की, “हे ते लोक आहेत ज्यांना मेंटल या शब्दाचा प्रॉब्लेम होता.” लवकरच कंगना रणौतचा जजमेंटल है क्या. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नाव आधी मेंटल है क्या असं होतं. यावर अनेक डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. यासोबतच दीपिका पादुकोणच्या द लिव लव लाफ या फाऊंडेशननेही आक्षेप घेतला होता.

‘पब्लिसिटी मिळवण्याचा हा किती वाईट आणि वाह्यात प्रकार आहे’ : रंगोली

दीपिकाच्या याच फाऊंडेशनच्या ट्विटर अकाऊंटवरून दीपिकाने एक बूमरँग व्हिडीओ शेअर केला आहे. याच पोस्ट रंगोलीने रिट्विट करत लिहिले आहे की, “हे काय चाललंय ? हे डिप्रेशन असतं, हे तेच लोक आहेत. ज्यांना मेंटल शब्दाचा प्रॉब्लेम होता. डिप्रेशन व्हिडीओवर वऱ्हाड्यांसारखं नाचत आहेत. पब्लिसिटी मिळवण्याचा हा किती वाईट आणि वाह्यात प्रकार आहे ..”

https://twitter.com/Rangoli_A/status/1147024880681938944

रंगोलीने साधला तापसी पन्नूवर निशाणा

नुकतंच रंगोलीने ट्विटरवर तापसी पन्नूला कंगनाची स्वस्त कॉपी म्हटलं होतं. यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी जेव्हा हे ट्विट पाहिलं तेव्हा त्यांनी उत्तर देत लिहिलं की, “रंगोली हे जास्त होत आहे. हे खूपच निराशाजनक आहे. मला कळत नाही मी यावर काय बोलू. तुझी बहिण तापसी दोघींसोबत काम केल्यानंतर… मला समजत नाहीये की….. एका ट्रेलरची स्तुती करणं म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीची स्तुती करणं असतं. यात कंगनाही येते.” यानंतर रंगोलीने अनुराग कश्यप यांना खूप ऐकवलं होतं.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1146461545141960704

https://twitter.com/Rangoli_A/status/1146603318304595968

 

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?