कंगनाची बहिण रंगोली ‘दीपिका’, ‘तापसी’ आणि ‘स्वरा’ला म्हणाली ‘बॉलिवूडची तुकडे गँग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलनं दीपिका पादुकोण, तापसी पन्नू आणि स्वरा भास्करला चिल्लर बॉलिवूडची टुकडे गँग म्हणून संबोधलं आहे. तिच्या मते कंगना सर्वांवर भारी आहे. जे अ‍ॅक्ट्रेस रंगोलीला आवडत नाहीत त्यांच्याबद्दल ती बिंधास्तपणे बोलत असते.

रंगोलीनं एक व्हायरल होणारं मीम ट्विटरवरून शेअर केलं आहे. यात कंगनाच्या कंटेम्पररी अॅक्ट्रेस जसे की, दीपिका पादुकोण, स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांचा समावेश आहे. फोटो असं दाखवलं आहे की, तापसी, स्वरा आणि दीपिका ग्रुपमध्ये येतात तर कंगना शेरनी एकटी आहे. हे मीम शेअर करताना रंगोली म्हणते, “ही पोस्ट व्हॉट्सअॅपवर सर्वत्र फिरताना दिसत आहे. हाहाहहा. पूर्णपणे सहमत. चिल्लर बॉलिवूडच्या टुकडे टुकडे गँगसाठी देशाची एकच मुलगी पुरेशी आहे. जय हिंद.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1224649309586481153

रंगोलीनं नेहमीच कोणावर तरी निशाणा साधत असते. त्यामुळे अधून मधून ती चर्चेचा हिस्सा बनत असते. करण जोहरनं कंगनासोबत काम करण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यावेळीही तिनं करणवर निशाणा साधला होता.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा पंगा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात ती कबड्डी प्लेअरच्या भूमिकेत दिसली होती.