अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता आदित्य पंचोली यांचा वाद अजूनही चालू आहे. सध्या यांच्या मधील अनेक नवीन नवीन गोष्टी समोर येत आहे. असे समजले होते की, आदित्य पंचोली यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला गेला होता. नुकताच कंगना रणौतने एक खुलासा केला. कंगनाची बहिण रंगोलीने आपल्या ट्विटरवर अनेक पोस्ट केले. ज्यामध्ये तिने सांगितले की, आदित्य पंचोलीने कंगना रणौतकडून १ करोड रुपये वसुल केले होते.

रंगोलीने शुक्रवारी ट्विट करुन आदित्य पंचोली यांच्यावर आरोप लावला. रंगोलीने सांगितले की, २००७ मध्ये आदित्य यांच्याविरोधात शारीरिक शोषण, उत्पीडन आणि वसुलीची तक्रार केली होती. त्याने कंगनाकडून १ करोड रुपये घेतले होते. जेव्हा कंगना ३ महिने बेघर होती तेव्हा त्याने कंगनाला सांभाळले. तेव्हा भाड्याच्या स्वरुपात कंगनाकडे १ करोडची मागणी केली.

रंगोलीने पुढे सांगितले की, ‘त्याला कंगनाकडून अजून पैसे वसुल करायचे होते. २०१६ मध्ये जेव्हा वसुलीसाठी त्याचा शेवटचा मेसेज मी पाहिला आणि पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाची एफआयआर पण नोंदविली गेली होती. कंगानाकडे या गोष्टींसाठी वेळ नाही. त्यामुळे मी ही केस माझ्या हातात घेतली आहे. जेणेकरुन कंगना तिचे काम करु शकेल.’

आदित्य यांच्याविरोधात एफआयआर गुरुवारी २७ जूनला नोंदविली गेली आहे. आदित्यने या आरोपाला चुकीचे सांगितले आहे. याव्यतिरिक्त त्याने या गोष्टींसाठी नकार ही दिला आहे. त्याने आपल्याविरोधात चाललेल्या एक्सटॉर्शन केसबद्दल माहिती दिली. आदित्य पंचोली चित्रपट ‘बाजीराव मस्तानीत दिसून आला होता. त्याचबरोबर तो ‘बॉडीगार्ड’, ‘रेस-2′ सारख्या अनेक चित्रपटात दिसून आला होता.’

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

Video : ‘या’ अभिनेत्रीने कॉपी केला दीपिका पादुकोणचा ‘लुक’

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like