लोकं का करतात एवढा तिरस्कार ? खुद्द कंगना रणौतनंच सांगितलं कारण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. गेल्या अनेक दिवसांपासून ती शेतकरी आंदोलनावर भाष्य करत असल्यानं चर्चेत आहे. बिहारच्या गया मधील एका कोर्टात कंगना विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस यांनी ही तक्रार दिली आहे. ही माहिती कळताच कंगानं 2 ट्विट केले आहेत आणि लोक तिचा एवढा तिरस्कार का करतात हे तिनं सांगितलं आहे. मी कायमच इंडस्ट्रीशी इमानदार राहिले आहे त्यामुळं त्यातील जास्तीत जास्त लोक माझ्या विरोधात आहेत.

कंगनानं तिच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. या सोबत तिनं लिहिलं की, मी कायमच इंडस्ट्रीशी इमानदार राहिले आहे त्यामुळं त्यातील जास्तीत जास्त लोक माझ्या विरोधात आहेत. मी आरक्षणाला विरोध केला तर जास्तीत जास्त हिंदू माझ्या विरोधात आहेत. मणिकर्णिका रिलीजच्या वेळी मी करणी सेने सोबत लढले. तर राजपूतांनी धमकी दिली. मी इस्लामिक कंट्टरपंथियांविरोधात उभी राहिले तर मुस्लिम लोक माझा तिरस्कार करू लागले. मी खालिस्तानींसोबत लढले तर जास्तीत जास्त शिख लोक माझ्या विरोधात झाले आहेत.

आणखी एका ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, मी वोट कमी करेल अशी व्यक्ती आहे त्यामुळं कोणताही राजकीय पक्ष माझं कौतुक करणार नाही. लोकांना आश्चर्य वाटत असेल की, मी जे काही करते ते का करते. या दुनियेहून वेगळी आणखी एक दुनिया आहे जिथं माझी अंतरात्मा आहे. तिथं माझं कौतुक होतं.

राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विनय कुशवाहा यांनी आरोप केला आहे की, कंगनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांच्या फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.