Fabulous Lives of Bollywood Wives : मधुर भांडारकरांचा करण जोहरवर टायटल चोरल्याचा आरोप ! Netflix वर रिलीज होतेय सीरिज (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नेटफ्लिक्स (Netflix) नं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींना घेऊन एक वेब रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेलर रिलीज केला होता. Fabulous Lives of Bollywood Wives असं या शोचं नाव होतं. आता फिल्ममेकर मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) या टायटलमुळं नाराज झाले आहेत. मधुर यांचा असा दावा आहे की, बॉलिवूड वाईव्स हे त्यांचं टायटल आहे. त्यांनी हे टायटल करणला देण्यास नकार दिला होता. मधुरनं शोचे निर्माते करण आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांना आपल्या शोचं टायटल बदलण्याची विनंती केली आहे.

मधुरनं या संदर्भात ट्विट करत लिहिलं की, प्रिय करण जोहर, अपूर्व मेहतानं मला वेबसाठी बॉलिवूड वाईव्स टायटल मागितलं होतं. यासाठी नकार दिला होता. कारण माझा प्रोजेक्ट निर्माणाधिन आहे. है नैतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या चुकीचं आहे. तुम्ही टायटलला फेब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स करत वापरलं आहे. कृपया माझ्या प्रोजेक्टला बरबाद करू नका. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की, तुम्ही टायटल बदला.

फेब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या फेमस वाईव्सच्या आयुष्याची झलक दाखवली जाईल. या शोची निर्मिती करण जोहरचं प्रॉडक्शन हाऊस धर्मेटीक (Dharmatic) नं केलं आहे. ही कंपनी इंटरनेटसाठी कंटेट बनवते. अपूर्व मेहता धर्मेटीकचे सीईओ आणि निर्माता आहेत. या शोचा ट्रेलर नेटफ्लिक्सनं 13 नोव्हेंबर रोजी रिलीज केला होता.

या शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेयची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि अ‍ॅक्ट्रेस नीलम कोठारी दिसणार आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, संजय कपूर, समीर सोनी, अनन्या पांडे, संजय कपूर हेदेखील दिसत आहेत. 27 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो रिलीज होणार आहे.

You might also like