BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर करण जोहर सिनेमा बनवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आहे असं दिसत आहे. याच वर्षी अनेक बायोपिक समोर येताना दिसणार आहेत. यात कपिल देवचा बायोपिक 83, जयललिता यांचा थलायवा, गुंजन सक्सेनाचा गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल असे अनेक सिनेमे आहेत. असं असताना बॉलिवूडच्या बी टाऊनमध्ये आणखी एका बायोपिक बनवला जाण्याची माहिती समजत आहे.

एका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर अलीकडेच BCCI च्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला आहे. असं म्हटलं जात आहे की, करण सौरव गांगुलीला एक दोन वेळा भेटला आहे. वास्तविक पाहता सिनेमाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. करणनंही असं कोणतंही वक्तव्य केललं नाही. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या काही भेटींवरून असा अंदाज लावला जात आहे की, करण सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवणार आहे. त्यामुळेच तो वारंवार सौरवची भेट घेत आहे.

यावर्षी रिलीज होणारे बायोपिक
यावर्षी जे बायोपिक रिलीज होणार आहेत त्यात एक आहे 83. या सिनेमात रणवीर सिंग लिड रोलमध्ये असणार आहे. थलायवी या जयललिता यांच्या बायोपिकमध्ये कंगना रणौत लिड रोलमध्ये असणार आहे. गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या बायोपिकमध्ये जान्हवी कपूर लिड रोल करणार आहे. सरदार उधम सिंह या सिनेमात विकी कौशल लिड रोल करणार आहे. याशिवाय राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारीत पृथ्वीराज या सिनेमात अक्षय कुमार लिड रोल करणार आहे. मैदान सिनेमातही अजय देवगण लिड रोल साकारणार आहे. सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये परिणिती चोपडा लिड रोलमध्ये आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like