‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘माझ्यावरील सर्व आरोप खोटे’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाने पुन्हा एकदा त्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण दिले आहे, त्यासंदर्भात असे म्हटले जात आहे की त्यांच्या घरी झालेल्या पार्टीत सेलिब्रिटींनी ड्रग्स घेतले होते. ते म्हणाले की त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या व्यतिरिक्त करणने अनुभव चोप्रा आणि क्षितिज रवि प्रसाद यांच्यासंदर्भातही निवेदन दिले आहे.

करण जोहर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘त्या व्हिडिओबद्दल जे काही बोलले जात आहे ते सर्व चुकीचे आणि निराधार आहे. पार्टीमध्ये ड्रग्स वापरले जात नव्हते. मी ड्रग्स घेत नाही आणि त्याचा प्रचारही करत नाही.’ अनुभव आणि क्षितिज त्यांच्या जवळचे नाहीत असे देखील करणने सांगितले.

सन 2019 मध्ये करण जोहरच्या घरी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत झालेल्या पार्टीवर बरीच चर्चा झाली होती. व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, विक्की कौशल, वरुण धवन, रणबीर कपूर, मलायका अरोरा अशा अनेक सेलेब्रिटी करणच्या घरात दिसत होते. करण जोहरने असेही लिहिले की, अनुभव चोप्रा धर्मा प्रोडक्शनचे कर्मचारी नाहीत. त्यांनी फक्त काही काळ काम केले.

दरम्यान एनसीबीने ड्रग्स प्रकरणाबाबत अनुभव आणि क्षितिज यांची चौकशी केली आहे. विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत एनसीबी ड्रग्स अँगलने चौकशी करत आहे. रिया चक्रवर्तीपासून सुरू झालेली तपासणी आता दीपिका पादुकोणपर्यंत पोहोचली आहे. रकुलप्रीत यांची चौकशी करण्यात आली आहे. सारा अली खान आणि श्रद्धा कपूरसुद्धा एनसीबीसमोर हजर होतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like