‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’मधून करण जोहर बाहेर ? समोर आलं सत्य ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अलीकडेच अशी माहिती समोर आली होती रोहित शेट्टी डायरेक्टेड आणि अक्षय कुमार स्टारर सिनेमा सूर्यवंशीमधून प्रोड्युसर करण जोहरनं काढता पाय घेतला आहे आणि आता तो सिनेमाचा हिस्सा नाही. पंरतु यात किती तथ्य आहे याचा खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सोशलवर सुरू असणाऱ्या नेपोटीजमच्या वादामुळं करण जोहरनं स्वत:च सूर्यवंशीमधून त्याचं नाव हटवलं होतं. अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीनंही यावर भाष्य केलं नव्हतं. करणनंही अधिकृतपणे काही सांगितलं नव्हतं. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शनं आता याबद्दलचं सत्य सांगितलं आहे.

तरणनं ट्विट करत लिहिलं की, “महत्त्वाची सूचना… करण जोहर सूर्यवंशी सिनेमाचा प्रोड्युसर नाही राहिलाय असं बोललं जात होतं. परंतु ही माहिती खोटी आहे. रिलायंस एंटरटेन्मेंटनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.” या ट्विटवरून लक्षात येत आहे की, करण जोहर सूर्यवंशी सिनेमाचा हिस्सा आहे. जी माहिती समोर आली होती ती खोटी आहे.

सूर्यवंशी हा सिनेमा आधी 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. पंरतु थिएटर्स बंद असल्यानं या सिनेमाची रिलीज टाळण्यात आली होती. या सिनेमा अजय देवगण सिंघम म्हणून खास अपीरंस देणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like