Karan Johar Party Video : करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीबाबत NCB मध्ये तक्रार दाखल ! दीपिका, मलायकासारखे ‘कलाकार’ होते सामील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीची एनसीबीला ड्रग्स अँगलने चौकशी करण्याची विनंती करत तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी बॉलिवूड कलाकारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे बॉलिवूडच्या कथित ड्रग्ज पार्टीच्या समस्येबाबत तक्रार दाखल केली आहे, ज्यात एजन्सीला चौकशी करण्यासाठी सांगितले गेले आहे की, करण जोहरच्या घरी गेल्या एक ‘ड्रग पार्टी’ झाली होती.

एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांना सोशल मीडियावर आपले पत्र शेअर करत सिरसा यांनी सांगितले की, ते त्यांना भेटले आणि व्हिडिओची तपासणी करण्यास सांगितले आहे. सिरसा म्हणाले, ‘मी श्री. राकेश अस्थाना @narcoticsbureauat BSF चे हेड क्वार्टर, दिल्लीला भेटलो. मी फिल्म निर्माता @karanjohar विरोधात चौकशी आणि कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली आणि करण जोहरच्या घरी मुंबई येथे झालेल्या ड्रग पार्टीच्या आयोजनाच्या व्हिडिओची चौकशी करण्याबाबतही मी सांगितले आहे.’

या पत्राच्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येते की, दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि शाहिद कपूर यांची चौकशी केली जावी. सिरसा यांनी आपल्या पत्रात असेही म्हटले की, कलाकार पार्टीमध्ये ‘ड्रग्ज सेवन’ करताना दिसले. मात्र व्हिडिओमध्ये कोणीही ड्रग्जचे सेवन करताना दिसत नाही.

करणने यापूर्वी स्पष्ट केले होते की, त्याच्या घरी कोणीही या पार्टीत ड्रग घेत नव्हते. त्याने म्हटले होते, ‘इंडस्ट्रीच्या या सदस्यांना एका अवघड आठवड्यानंतर एक चांगला वेळ घालवताना पाहून मला आनंद झाला होता आणि मी हा व्हिडिओ अगदी मनापासून केला. जर मी काही करत असतो, तर मी तो व्हिडिओ डिलीट केला असता, मी मूर्ख नाही.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like