‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – निर्माता करण जौहरने त्याच्या पार्टीत ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून सर्वांसमोर त्याची बाजू मांडली आहे. राजीव मसंदसोबत झालेल्या मुखातीवेळी त्याने याबाबत खुलासा केला तो म्हणाला. जर त्या पार्टीत ड्रग्ज वापरली गेली असते तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असता का ? ‘पार्टीत इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्स होते. आठवडाभर काम केल्यानंतर सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते. ही कॉमन नाईट आऊट पार्टी होती. मी तो व्हिडिओ बनविला आहे.

जर त्यात काही चूक होत असेल तर मी तो व्हिडिओ का शेअर केला असता ?’ व्हीडीओ घेताना विकी कौशलजवळील लाईट रिफ्लेक्शन वेगळ्या पद्धतीने परावर्तित झाले. शिवाय कोणालाही आपला फोन खिशात ठेवण्याची परवानगी नव्हती. दरम्यान विक्की डेंग्यूच्या आजारातून नुकताच बरा झाला होता. त्यावेळी गरम पाण्यात मिसळलेल्या लिंबाचा रस प्याला होता. हा व्हिडिओ शूट करण्यापूर्वी माझी आईसुद्धा पाच मिनिटे आमच्याबरोबर बसली होती. ती एक कौटुंबिक सामाजिक पार्टी होती.

करण निरााधार आरोपांना उत्तर देत नाही. अशा आरोपांचा त्याच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याने या आरोपांबाबत मौन बाळगण्याचे ठरविले होते. पण जर असे पुन्हा झाले तर तो त्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करेल, अशी सुचनाही त्यांने यावेळी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like