भावाच्या ‘रिसेप्शन’ पार्टीत करिश्मा-करीनानं ‘करण’सोबत लावले ‘ठुमके’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कपूर सिस्टर्सने आपल्या चुलत भावाच्या लग्नात चांगलीच धमाल केली. बॉलिवूड अभिनेता अरमान जैनचे मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी अनीसा मल्होत्राशी लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या दोन्ही बहिणींनी आपल्या भावाच्या लग्नात जोरदार डान्स केला. लग्नानंतर अरमान आणि अनीसाच्या रिसेप्शन पार्टीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कपूर परिवारासह अरमान आणि अनीसाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक इतर कलाकारही दिसले. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरसोबत करिश्मा आणि करीना जोरदार नाचताना दिसल्या.

‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या ‘बोले चुडियां’ या गाण्यावर अरमान जैन आणि अनीसा मल्होत्रा यांच्या रिसेप्शन पार्टीत करीना कपूर आणि करिश्मा कपूर करण जोहरसोबत डान्स करताना दिसल्या. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे, यामध्ये करण जौहरसोबत अभिनेत्री दोघेही जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहेत.

रिसेप्शन पार्टीमध्ये करीना कपूर सिल्व्हर कलरच्या लेहेंगामध्ये दिसली होती, तर करिश्मा कपूरही व्हाईट आउटफिटमध्ये दिसली आहे. त्याचबरोबर करण जोहरही रेड कलरच्या शेरवानीमध्ये जबरदस्त दिसत आहे.

रिसेप्शनचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात गौरी खान, शाहरुख खान आणि करण जोहरसोबत नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे तिघेही अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रसिद्ध गाण्यातील ‘कजरारे’ वर नाचताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8Kk2AIJ2sI/?utm_source=ig_embed

व्हिडीओमध्ये आधी शाहरुख खान आणि गौरी खान एकत्र नाचत आहेत, पण त्यानंतरच ती किंग खानला मारते आणि त्याच्या जागी करण जोहरच येतात. तिघांचा जबरदस्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/B8HJV60p5Qg/