‘सारा’ ला विचारला ‘One Night Stand’ बद्दल प्रश्न, उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाली ‘करिना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान सैफची दुसरी पत्नी करीना कपूर हिच्या चॅट शोच्या नुकत्याच एपिसोडमध्ये दिसली आहेत. या शोमध्ये करीनाने साराला तिच्या लव्ह लाइफ आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले आहेत. इतकेच नाही तर करीनाने साराला तिचा ‘वन नाईट स्टँड’ आणि ‘नॉटी मेसेज’ पाठविण्यासारखे वैयक्तिक प्रश्न विचारले आहेत. सारा अली खान देखील तिच्या सावत्र आईच्या कार्यक्रमात तिच्या लठ्ठपणाबद्दल बोलताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8ON97Elf6v/

सारा अली खान करीना कपूर खानच्या रेडिओ शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ च्या दुसऱ्या सीझनच्या नवीन एपिसोडमध्ये प्रेमाविषयी बोलताना दिसली. करीनाने साराला विचारले की, ‘तिने कधी कुणाला अश्लील मेसेज पाठवले आहे का ?’ पण हे प्रश्न विचारल्यानंतर लगेचच करीना पुढे म्हणाली, ‘मी अशी आशा करते की तुझे वडील हे सर्व ऐकत नसावे.’

https://www.instagram.com/p/B7_AF4-FA2D/

यावर सारा म्हणाली, “होय.” हे ऐकून करिना म्हणते, ‘मी तुझ्या वडिलांना सांगू शकते, नाही का ?’ सारा म्हणते, “हो, ते कदाचित हा शो पाहतील.” करीना म्हणते, “ओके सैफ, मी घरी येऊन तुला सांगेन.” तर ताबडतोब सारा म्हणते, ‘नाही, असं करु नकोस.’

या शोमध्ये करीना ‘वन नाईट स्टँड’ वर साराला प्रश्न विचारते, ज्यामध्ये सारा ‘नाही’ म्हणते. हा प्रश्न विचारण्यापूर्वी करीना म्हणाली, ‘मी तुला असे प्रश्न विचारावे की नाही हे मला माहित नाही, पण ठीक आहे, आपले एक आधुनिक कुटुंब आहे. तुम्ही कधी वन-नाईट स्टँड केले आहे का? ‘ यावर साराचे नाही उत्तर ऐकून करिना म्हणते, “थँक गॉड, ही एक आनंदाची बाब आहे.”

https://www.instagram.com/p/B7_Dv1IF1ux/

या शोमध्ये करीनाने साराला विचारले की 20 वर्ष जुन्या आणि आजच्या प्रेमाच्या नात्यात काय बदल झाले आहे? यावर सारा म्हणाली, ‘मला वाटते आता स्त्रियांनी आपल्या जोडीदारांना या नात्यात काय हवे आहे ते उघडपणे सांगायला सुरुवात केली आहे. परंतु असे आधी झाले नव्हते. ‘सारा पुढे म्हणाली, त्या दिवसांमध्ये एक प्रकारची लाज होती, जी स्त्रियांमध्ये असायची आणि ती स्त्रियांसाठी एक योग्य मार्ग देखील मानली जात होती, पण आता मला वाटतं स्त्रिया खूप मनमोकळ्यापणाने बोलत आहेत आणि आपल्या जोडीदाराकडून काय हवे आहे ते लगेच बोलतात. ‘

अभिनेत्री म्हणाली, ‘हे कदाचित आर्थिक स्वातंत्र्यामुळे किंवा मानसिक स्वातंत्र्यामुळे किंवा कदाचित स्त्रियांना आता स्वतःबद्दल जास्त विश्वास वाटण्यामुळे होऊ शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की ही केवळ शारीरिक गरजांची बाब आहे, कदाचित आता आम्ही स्त्रियांची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक उघडपणे बोलू शकलो आहोत. ‘

सारा सध्या ‘लव आजकल’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिक आर्यनची जोडी पाहायला मिळणार आहे. ‘लव आज कल’ 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे.