Coronavirus : ‘कोरोना’मुळं ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये ‘बेबो’ करीना, ‘अशा’ प्रकारे देतेय फिटनेसवर ‘लक्ष’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा कहर सुरू झाल्यानंतर सर्व बॉलिवूड स्टार आता आपापल्या घरातच कैद आहेत. सामान्य नागरिकांनीही स्वत:ल घरात बंद करून घेतलं आहे. 31 मार्च 2020 पर्यंत पूर्ण देशात शाळा, कॉलेज, जीम, थिएटर सर्व काही बंद आहे. याशिवाय गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही सांगितलं जात आहे.

सेलेबिटी लोकही घरात राहून वर्काआऊटवर विशेष लक्ष देताना दिसत आहेत. कॅटरीना कैफनंही काही होम वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर केले होते. या सगळ्यानंतर आता करीनाचा देखील एक फोटो समोर आला आहे ज्यात ती तिची फरफेक्ट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B98obwhpZJJ/

करीना कपूरच्या लुकबद्दल बोलायाचं झालं तर तिनं ब्लॅक कलरचा जीम कॉस्ट्युम घातला आहे. या फोटोत करीनाच्या चेहऱ्यावर किंचित स्माईलही दिसत आहे. फोटोत करीना फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. करीनाचा हा परफेक्ट फिगरवाला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करीना एका मुलाची आई असूनही एवढी फिट आहे हे पाहून सारेच तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सारेच थिएटर 31 मार्च 2020 पर्यंत बंद आहेत. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.