‘बेबो’ करीना ‘प्रेग्नंट’, सैफ अली खानच्या घरी येणार नवा पाहुणा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि पती अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला भावंड मिळणार आहे.

2009 साली सैफ आणि करीना आपल्या रिलेशनशिपमुळे खूप रहात होते. 2012 साली सैफ आणि करीना यांनी लग्न केलं होतं. टशन या सिनेमाच्या शुटींगजदरम्यान त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. लग्नानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 20 डिसेंबर 2016 रोजी तैमूरचा जन्म झाला होता. सैफ आणि करीना बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like