जेव्हा करीना कपूरनं आमिर खानसाठी शाहरुखला दिला होता ‘नकार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   करीना कपूर खानने पुन्हा एकदा खुलासा केला की, तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करियरमध्ये किती चित्रपटांना नकार दिला आहे.त्यापैकी एक रोहित शेट्टीचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ आहे. आमिर खानच्या ‘तलाश’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने अभिनेत्रीने शाहरुख खानचा चित्रपट आमिर खानसाठी नाकारला होता.

अलीकडेच एका मुलाखतीत करीनाने सांगितले की, रोहित शेट्टी तिला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मध्ये घेऊ इच्छित होता. मात्र, त्यावेळी ती ‘तलाश’ चित्रपटाचे शूटिंग करत होती म्ह्णून तिने शाहरुख खानच्या चित्रपटास नकार दिला. यानंतर ही भूमिका दीपिका पादुकोणला देण्यात आली. हे पात्र तिने उत्तम प्रकारे साकारले. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा अजूनही बॉलिवूडमधील सर्वाधिक पसंतीचा चित्रपट आहे. दरम्यान, आता करीना करण जोहरच्या पीरियड ड्रामा, ‘तख्त’ मध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, विक्की कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी आणि अनिल कपूर यांच्यासमवेत दिसणार आहे. ती आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दुसरीकडे, शाहरुख खान अद्याप त्याचा पुढील प्रकल्प जाहीर करू शकलेला नाही. त्याच्या आगामी चित्रपटाविषयी अनेक बातम्या येत असल्या तरी अभिनेत्याने अधिकृतपणे याची पुष्टी केली नाही. झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यापासून शाहरुख खान चित्रपटांपासून दूर राहिला आहे.परंतु त्याने काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. शाहरुख खानला आता प्रेक्षक रोमँटिक नायक म्हणून पसंत करत नाही. झिरो या चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटानंतर या दोघींचाही कोणता चित्रपट आला नाही. दरम्यान, नुकताच अनुष्काने काही वेब मालिका प्रोड्युस केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like