Video : बेबो करिना कपूरचा पोलिसांच्या ड्रेसमधील व्हिडिओ ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर सध्या लंडनमध्ये आपल्या ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. हा चित्रपट ‘हिंदि मीडियम’चा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या सेटवरुन करिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये करिना पोलीस वर्दीमध्ये दिसत आहे. यामध्ये करिना स्लो मोशनमध्ये चालताना दिसत आहे. स्लो मोशनमध्ये चालताना करिना खूपच रॉयल अंदाजात दिसत आहे.

करिना कपूरच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये करिनाच्या स्वॅगचे खूप कौतुक होत आहे. चाहते कमेंट करत आहे की, ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचे ते खूप उत्साहाने वाट पाहत आहे. करिनाने एका मुलाखतीत सांगितले की, ती चित्रपटाचे हिरो इरफान खानसोबत काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/BzhdwxJFwQ_/?utm_source=ig_web_copy_link

करिनाने सांगितले की, ‘मी इरफानची खूप मोठी फॅन आहे पण मी त्यांच्यासोबत रोमॅंस करणार नाही. चित्रपटात माझा छोटा आणि इट्रेस्टिंग रोल आहे. मला माझ्या कंफर्ट झोनमधून बाहेर यायचे होते. मला पहायचे होते की, यामुळे काय होते. माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे आणि खूप मनोरंजक आहे.

‘चित्रपटाचे प्रोड्यूसर दिनेश विजानने सांगितले की, ‘इरफान खान, चंपक नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ज्याचे उदयपुरमध्ये एक दुकान आहे. राधिका मदान चित्रपटामध्ये इरफानच्या मुलीची भूमिका साकारत आहे. जीला परदेशात शिक्षण घ्यायचे असते. तिच्या वडिलांचे बॅकग्राऊंड आणि भाषा तिच्या शिक्षणात अडथळा बनतो.’ या नवीन कथेला होमी अदजानिया डायरेक्ट करत आहे.

या व्यतिरिक्त करिना कपूरकडे ‘गुड न्यूज’ चित्रपट आहे. या चित्रपटात करिना एका सरोगेट आईची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात करिनासोबत अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांझ दिसून येणार आहे. करिना या चित्रपटाची शूटिंग करत आहे. त्याचबरोबर करिनाकडे करण जोहरचा ‘तख्त’ चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग, जान्हवी कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान