१९ वर्षांच्या करियरमध्ये करीना कपूर पहिल्यांदाच ‘खाकी वर्दी’त

मुंबई : वृत्तसंस्था – चित्रपटसृष्टीतील कपूर परिवारामधील शान करीना कपूर पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत पडदयावर दिसणार. १९ वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत काम करणार. तसेच ही बातमी आत्ताच ‘मर्दानी 2’ चित्रपटातील राणी मुखर्जीचा नवीन लुक रिलीज त्यासोबतच ही बातमी आली आहे. करीना कपूर लवकरच प्रेक्षकांचा भेटीला हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची शूटिंग १५ मे पासुन सुरु होणार आहे.

करीना कपूर खानने २००० वर्षांपासून आपल्या करियरची सुरवात चित्रपट ‘रेफ्यूजी’ अभिषेक बच्चन सोबत केली होती. आतापर्यंत अनेक प्रकारचे चित्रपट करीनाने केले आहेत, कभी खुशी कभी गम, चमेली, ओमकारा, जब वी मेट, बॉडीगार्ड, ऐतराज़, हीरोइन, तालाश, एक मैं और एक तू, की एंड का, वीरे दी वेडिंग, अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. आणि सर्वांनी तिचे कौतुक देखील केले आहे. आकर्षक अवतारासाठी प्रसिद्ध असलेली करीना कपूरने कधीच पोलिसाची भूमिका केली नाही. आणि आता ती पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत काम करणार आहे. तिच्याबरोबरच प्रियांकानी ‘जै गंगाजल’ आणि जंजीर, रानी मुखर्जी ने मर्दानी आणि सुष्मिता सेन यांनी पोलिसाच्या भूमिकेत काम केले आहे.

‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटानंतर करीना आपल्या रेडिओ टॉक शोमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती २७ डिसेंबर रोजी येणारा चित्रपट गुड न्यूज़ मध्ये अक्षय कुमार च्या विरोधात भूमिका करणार आहे. व त्यानंतर ती कारण जोहर चा चित्रपट तख्त ची सुरवात करणार आहे. यासोबतच ती ‘अंग्रेज़ी मीडियम’ या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. जो ‘हिंदी मेडियम’ चा दुसरा भाग आहे. होमी अदाजानिया दिग्दर्शित चित्रपटाची शूटिंग मुंबई मधून सुरवात करणार आहे.

एक आठवडा मुंबई मध्ये चित्रपटाची शूटिंग केल्यानंतर ती चित्रपटाच्या मुख्य भागाची शूटिंग करण्यासाठी लंडनला जाणार आहे. या वेळेस परत एकदा ‘अंग्रेज़ी मीडियम’ चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर यावेळी सबा वारला विशेष अपील मिळेल आणि राधिका मदन इरफान आणि सबाची मुलगी खेळताना दिसेल.