24 वर्षांपूर्वी करिश्मा कपूरच्या ‘या’ गाण्यातील अश्लील शब्दांवरून झाला होता ‘राडा’, बदलावं लागलं गाणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सिल्वर स्क्रीन पासून दूर असणाऱ्या अभिनेत्री करिश्मा कपूरनं मेंटलहुड या सीरिजमधून डिजिटल डेब्यू केला आहे. सध्या ती या सीरिजच्या प्रोमशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिनं सुपरहिट साँग बेबी बेबीवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

1999 साली रिलीज झालेल्या खुद्दार सिनेमात करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी एकत्र काम केलं आहे. करिश्माच्या या गाण्यामुळं त्यावेळी खूप गोंधळ झाला होता. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत करिश्मानं यावर भाष्य केलं आहे. करिश्मा म्हणाली, “जेव्हा मी हे गाणं केलं तेव्हा खूप वाद झाला होता. आधी या गाण्याचे बोल होते ‘मुझे लोग बोले सेक्सी सेक्सी’. परंतु लोकांनी गोंधळ घातल्यानंतर ‘मुझे लोग बोले बेबी बेबी’ असा या गाण्यात बदल करण्यात आला. अलीशा चिनॉय आणि अनु मलिक यांनी हे गाणं गायलं होतं. इंदरवार यांनी हे गाणं लिहिलं होतं.”

पुढे करिश्मा म्हणाली, “आजच्या काळात या शब्दाचा वापर जास्त केला जातो. माझ्या काळात टाईट शॉर्ट किंवा बिकीनी घालणं सोप नव्हतं. आजच्या अभिनेत्री सहज बिकीनी घालतात. माझ्या काळात ड्रेस व्यवस्थित घालावा लागत होता. नीट कपडे घालूनही त्या गाण्यासाठी लोक म्हणाले हे कसले कपडे आहेत.