अभिनेत्री करिश्मा कपूरचं लाईव्ह कार्यक्रमात बहिण करीना कपूरबाबत ‘धक्कादायक’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री करिश्मा कपूरने डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. सिनेमांपासून दूर असणारी करिश्मा अनेक रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावत असते. या शोमध्ये करिश्माने डान्स करून सर्वांचे मन जिंकले. यावेळी करिश्माने करीना कपूर बाबत एक खुलासा केला आहे. करीनाबाबत तीला विचारण्यात आल्यावर तिने हा खुलासा केला आहे. करिश्माने या शोमध्ये केलेला डान्स पाहून अनेकांना ९० चा दशकातील करिश्मा आठवली असेल यात मात्र शंका नाही. करिश्माने स्पर्धकांना डान्ससाठी टीप्स देत मार्गदर्शनही केले.

View this post on Instagram

#sistergoals @therealkarismakapoor 😗😗

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

डान्सच्या या रिअॅलिटी शोमध्ये करिश्माला करीनाबाबत लहानपणीच्या आठवणी सांगण्याची विनंती केली होती. परंतु करीनाबद्दल सांगितलेल्या खट्याळ आठवणी ऐकल्यानंतर सर्वच चकित झाले. बालपणीची आठवण सांगताना करिश्मा म्हणाली की, “शाळेत असताना मी अगदी संयमी विद्यार्थिनी होते आणि सर्वजण मला मिस गुडी टू शूज म्हणून बोलायचे.”

View this post on Instagram

Lazy Saturday 😂 #holidays @therealkarismakapoor

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

पुढे करिश्मा म्हणाली की, “मी अगदी शिस्तप्रिय मुलगी होते. परंतु करीना एकदम फटाका होती. ती खूपच खट्याळ होती आणि नेहमीच कुठेतरी पळून जात असे. आम्ही तिला शोधत फिरत असू. मी अगदीच साधी तर करीना माझ्या एकदम उलट आहे. ते म्हणतात ना विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तींना एकमेकांबद्दल प्रेम वाटतं. म्हणूनच आम्ही दोघी एकमेकींच्या अगदी जवळ आहोत.” करीश्मा आणि करीना यांचं नातं नक्कीत कौतुक करण्यासारखं आहे हे मात्र नक्की.

View this post on Instagram

Lazy Lunches @therealkarismakapoor ❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like