अभिनेत्री करिश्मा कपूरनं ‘स्टॅम्प ड्युटी’त कपात झाल्यानंतर ‘एवढ्या’ कोटींना विकला फ्लॅट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सध्या सिनेमांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावर ती कायमच सक्रीय असते. पुन्हा एकदा करिश्मा तिचा फ्लॅट विकण्यामुळं चर्चेत आली आहे. करिश्मा आणि तिची आई बबीता कपूर यांनी मुंबईत त्यांचा एक फ्लॅट 10.11 कोटीत विकला आहे. यानंतर अ‍ॅक्ट्रेस त्या बॉलिवूड सेलेब्समध्ये समाविष्ट झाली जे स्टॅम्प ड्युटीत कपात झाल्यानंतर घर विकून लाभ घेत आहेत.

करिश्मानं मुंबईतील खार भागातील 10 व्या मजल्यावर अपार्टमेंट विकलं आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, 1610 स्क्वे.फूट अपार्टमेंटची विक्री ही 24 डिसेंबर 2020 रोजी नोंदवण्यात आली. यासाठी तिनं 20.22 लाखांचं स्टॅम्प शुक्ल अदा केलं. अभिनेत्रीचं हे घर मुंबईच्या पश्चिम खारच्या रोज क्वीनमध्ये होतं, जिथं या सोबत दोन कार पार्किंगही मिळत आहेत. आभा दमानी यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे.

महाराष्ट्र सरकारनं रिअल इस्टेट सेक्टरमध्ये थोडी तेजी आणण्यासाठी अलीकडेच स्टॅम्प ड्युटीत कपात करण्याची घोषणा केली होती. याचा परिणाम आता पहायला मिळत आहे. याच मोक्याचा लाभ घेत अनेक बड्या सेलेब्सनं आपली प्रॉपर्टी विकली.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिनं डिजिटल डेब्यू केला आहे. एकता कपूरच्या अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या सीरिजमध्ये करिश्मानं काम केलं आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक होताना दिसलं. या वेब सीरिजमधून तिनं दीर्घकाळानंतर अ‍ॅक्टींगमध्ये कमबॅक केलं आहे.