इंजिनियर बनायचे होते बनला अभिनेता, याच्यावर फिदा बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सतत नवे कलाकार येत असतात. यापैकी मोजकेच कलाकार असे असतात जे आपल्या कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावतात. असाच एक अभिनेता आहे ज्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे आणि त्याचबरोबर लोकांची मने जिंकण्यात यश मिळविले आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीच्या नव्या अभिनेत्रींच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्याचा आज 29 वा वाढदिवस आहे. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो म्हणजे कार्तिक आर्यन….

आम्ही तुम्हाला कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, चित्रपटांमध्ये येऊन इतका मोठा स्टार होईल याची कार्तिकला कल्पना देखील नव्हती. कार्तिक चित्रपटात येण्यापूर्वी तो इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. त्याने मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि त्यानंतर सिलसिला स्टुडिओमध्ये जाण्यास सुरुवात केली. अनेक प्रयत्नांनंतर त्याने क्रिएटिव्ह कॅरेक्टर अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर २०११ मध्ये त्याचा पहिला चित्रपट म्हणजेच ‘प्यार का पंचनामा’ मध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली.

पहिल्या चित्रपटातून कार्तिकला यश मिळालं पण त्यानंतर त्याचे अनेक चित्रपटही फ्लॉप झाले. त्यानंतर, ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘प्यार का पंचनामा 2’ च्या सिक्वेलने त्यांची कारकीर्द टिकवली. आज कार्तिकने ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छुप्पी’ यासारखे उत्तम चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्याच्या आगामी चित्रपट ‘पति पत्नी और वो’, ‘भूल भूलैया 2’ आणि ‘लव आज कल 2’ सारख्या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे.

कार्तिक आर्यनच्या लूकवर अनेक अभिनेत्री फिदा आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडच्या दोन नवीन अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे या ही दोघी कार्तिक आर्यनवर फिदा आहे. सध्या कार्तिक साराला डेट करत आहे. कार्तिक आर्यन याच्या चित्रपटांबरोबरच त्याची फॅन फॉलोव्हिंगही दररोज वाढत आहे.

Visit : Policenama.com